( 8 Sep, 2015) लक्षात ठेवण्याच्या सोप्या पद्धति Published By : upscgk.com �� उप दिशा कशा लक्षात ठेवाल.(घड्याळाच्या दिशेने) "वानर इकडे आले नाही" वा = वायव्य ई = ईशान्य आ = आग्नेय ना = नैरुत्य विषाणूंमुळे होणारे रोग कसे लक्षात ठेवायचे. “कांदे पोइए गोड का रे झाले”. (पोइए = पोहे असे समजावे.) स्पष्टीकरण १) कां = कांजण्या २) दे = देवी ३) पो = पोलिओ ४) इ =इन्फुएन्झा ५) ए =एड्स ६) गो = गोवर. ७) ड = डेंग्यू ८) का = कावीळ ९) रे = रेबीज. जीवाणूंमुळे होणारे रोग कसे लक्षात ठेवाल. “धनुला क्षयरोग ओ कुष्ठरोग झाला म्हणून त्याने न्युमोनिया विषाचा घोट पटकन घेतला”. महत्वाचे रोग खालील प्रमाणे. १) धनुर्वात २) क्षयरोग ३) कुष्ठरोग ४) न्युमोनिया ५) विषाचा = विषमज्वर ६) घोट = घटसर्प ७) पटकन = पटकी गांधीजींच्या सक्रीय चळवळी क्रमाने कशा लक्षात ठेवाल. “ चंपाच्या खेड्यातील गिरण्यांनी संप केला म्हणून गांधीजींनी रोलेट act नुसार असहकार चळवळीच्या माध्यमातून सविनय वैयक्तिक भारत सोडण्याचा निर्णय घेतला.” १९१७ = चंपारण्य सत्याग्रह १९१८ = खेडा सत्याग्रह १९१८ = अहमदाबाद गिरणी संप १९१९ = रोलेट act विरोधात सत्याग्रह १९२० =असहकार चळवळ १९३० = सविनय कायदेभंग चळवळ १९४० = वैयक्तिक सत्याग्रह १९४२ = भारत छोडो आंदोलन दोन वेळा नोबल पुरस्कार मिळालेले शास्त्रज्ञ ‘मडम आणि जॉन फ्रेडली बोलतात’ १. मडम – मडम क्युरी २. जॉन – जॉन बारडिन ३. फ्रेंड – फ्रेंडरिक सेंगर ४. ली – लिनस पोलिंग महाराष्ट्रातील घाट १) आंबा कोर = आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी २) माथूना = मुंबई ते नाशिक - थळ घाट ३) बापुचादिवा = पुणे ते बारामती - दिवा घाट. ४) कुंभा चिपक = कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट ५) खांबाला पूस = पुणे ते सातारा - खंबाटकी घाट. ६) फोकोगा = फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा. ७) मुना कसा आहेस = मुंबई ते नाशिक - कसारा घाट. "छत्री उलटी झाले" छ - छत्तीसगड उ - उत्तराखंड झ - झारखंड चांदीचे चार प्रमुख उत्पादक देश उतरत्या क्रमाने ‘मी पकडला चोर’ १. मी – मेक्सिको २. पकडला – पेरू ३. चोर - चीन सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे “साथ आहे मी तुझ्या” सात – सातमाळ आ - अजिंठा हे - हरिश्चंद्र मी - महादेव सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे “साथ आहे मी तुझ्या” सात – सातमाळ आ - अजिंठा हे - हरिश्चंद्र मी - महादेव अनुसूचित जमाती साठी राखीव महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ कसे लक्षात ठेवाल? " दिपाचा नंदू कोठे गेला" दि = दिंडोरी पा = पालघर चा = चिमूर नंदू = नंदुरबार रा...राज्ये.....वे...वेतन शे.....शपथ रा....राज्यसभा आ....अनुसूचित जाती व जमाती डे....डोंगराळ भाग आसाम,मेघालय सू.....सूची भा....भाषा ज....जमीनदारी प....पक्षातंर बंदी स्था...स्थानिक स्वराज्य संस्था न...नगरपालिका भारताची वैमानिकविरहित विमाने लक्षात कशी ठेवाल. ' लक्षाने निशाना साधत रुस्तामचे दोन नेत्र फोडले.' १) लक्षाने - लक्ष २) निशाना- निशांत ३) रुस्तामचे दोन रुस्तम -१ ४) रुस्तम -२ ५) नेत्र