( 8 Sep, 2015) दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान Published By : upscgk.com * ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो. * ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात. * ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’ शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविते. * आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. *० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के घनपदार्थ असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश, ३.५ ते ३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व ०.६ ते ०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात, म्हणून दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात. * मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम दुधाची आवश्यकता असते. * ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग होतो. * मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित आहे. * माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश सेल्शिअस असते. * डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात केला जातो. * मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो. * इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते. * मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते. रक्तामध्ये मँगेनिज हे द्रव्य असते. * ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास ‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात. * मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक जास्त प्रमाणात असते. * मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो. * कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग करतात. * तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये कॅफीन हे अपायकारक द्रव्य असते. * रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ झाल्यास ब्लड कॅन्सर होतो. * पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर व कावीळ. * हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व इन्फ्लुएंझा * मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळे होतो. * मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व लॅप्सो स्पायरसी * रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे. *नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते. * सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात. * हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते. * पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात. * रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त आहे. * शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने हृदयविकाराचा झटका येतो. * रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारे कोलेस्टेरॉल रक्तातून वाहते. * शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारे मोजले जाते. * शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’ हा घटक करतो. * केमोथेरपी व रेडिओथेरपी हे उपचार कर्करोगावरील आजाराकरिता घेतले जातात. * मेंदूतील टय़ुमर ओळखण्यासाठी आर्सेनिक व आयोडिनचा वापर करतात. * रक्ताभिसरणातील दोषावरील उपचारासाठी उपयुक्त समस्थानिक म्हणजे सोडियम २४ होय. * मानवी शरीरात गुणसूत्रांच्या २३ जोडय़ा असतात. * - गुणसूत्रामुळे मुलाचा जन्म होतो. * पुरुषांमध्ये - गुणसूत्र असतात * स्त्रियांमध्ये - गुणसूत्र असतात. * अपत्याचे लिंग ठरविण्याचे श्रेय पित्याकडे जाते.